कोल्हापूर - शहरातील पंचगंगा स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. स्मशानशेड पुर्णपणे खराब झाले असून शेडवरील पत्रे फाटले आहेत. तर विविध ठिकाणी मोठी छिद्रे पडून या पत्र्यांची चाळण झाली असून या शेडमधून पावसाचे पाणी बेडवर पडत असल्याने अंत्यसंस्कारात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी या शेडची दुरुस्थी व पत्र्याचे छप्पर बदलायला महापालिकेला सवड मिळणार का?असा सवाल आता नागरिकांच्यातून उपस्थित केला जात आहे.
video - डॅनियल काळे